अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- एका विवाहितेने घरापासून काही अंतरावर असलेल्या सामायिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील निंमोणी मळा परिसरातील कसारवस्ती येथे घडली आहे.
हिराबाई दादासाहेब कसार (वय 50) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घरातील नातेवाईकांंनी हिराबाई घरात दिसत नसल्याने त्यांचा शोध घेतला.
परंतु सामायिक विहिरीजवळ मयत हिराबाई यांची चप्पल आढळून आल्याने संबंधित नातेवाईक, ग्रामस्थ यांनी विहिरीमध्ये लाईटच्या साहाय्याने डोकावून पाहीले असता विहिरीत हिराबाई यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
याबाबतची माहिती तातडीने ग्रामस्थांनी श्रीरामपूर पोलिसांना कळविली. पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. दरम्यान स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.