अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- समाईक बांध कोरत असताना तू आमचा बांध कोरू नको आपण जमिनीची मोजणी करून घेऊ . असे म्हणल्यास राग येऊन महिलेला खोऱ्याने जबर मारहाण केली.
यात सरस्वती बबन नवथर असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथे घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तुम्ही सामाईक बांध कोरू नका.
आपण जमिनीची मोजणी करून घेऊ असे म्हणण्याचा राग येऊन आपल्या हातातील खोऱ्याने महिलेच्या डाव्या हाताच्या पंजावर तसेच पाठीवर मारून जखमी केले. पुन्हा जर काही बोललास तर जीवे मारू अशी धमकी दिली.
याप्रकरणी राहुल संभाजी नवथर सचिन संभाजी नवथर (दोघेही रा. पिंपरी शहाली ता.नेवासा )यांच्याविरुद्ध नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved