अहमदनगर बातम्या

Nighoj Kund : निघोज कुंडात पाय धुण्यासाठी गेलेली महिला परत आलीच नाही…

Published by
Ahmednagarlive24 Office

Nighoj Kund : पारनेर तालुक्यातील निघोज येथील जगप्रसिद्ध कुंड पर्यटन स्थळावरील कुंडात पाय धुण्यासाठी गेलेली महिला पाय घसरल्याने बेपत्ता झाली असून, दुसऱ्या दिवशी ही शोध मोहीम सुरू असून, अद्याप मृतदेह हाती लागला नाही.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील मोह गव्हाण येथील पद्माबाई शेषराव काकडे ही ५५ वर्षे वयाची महिला पाय धुण्यासाठी कुंडात उतरली असता, पाय घसरून पडली. या महिलेला शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील जावई महेंद्र शाहदेव औताडे यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला.

सदर महिला कुंडातील पाण्यात बेपत्ता झाली. याची माहिती निघोज पोलीस दूरक्षेत्रातील ठाणे अंमलदार गणेश डहाळे यांना समजली असता, त्यांनी व त्यांचे सहकारी पोलीस नाईक गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली.

या वेळी निघोज व टाकळी हाजी येथील तरुणांनी संबंधीत महिलेचा कुंडातील पाण्यात उतरून शोध घेतला असता, ती महिला आढळून आली नाही. रात्र झाल्याने व कुंडाला पाणी जास्त असल्यामुळे सकाळी पाणी बंद करून पुन्हा शोध मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कुंडावरील कुकडी नदीचे पाणी बंद करण्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून, पाणी रात्र बंद करण्यात आले आहे.

पद्माबाई काकडे ही वाशिम जिल्ह्यातील महिला जावई महेंद्र औताडे व इतर नातेवाईकांसह मळगंगा देवी व कुंडाई देवीच्या दर्शनासाठी आली होती. त्यावेळी ही घटना घडली. कुंड हे खाच खळग्यांनी बनलेले असल्याने शोध मोहिमेला अडथळे येतात. परिणामी मृतदेह हाती लागण्यास वेळ लागतो.

Ahmednagarlive24 Office