अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सध्या सर्वत्र खड्यांचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांच्या संतापानंतर काही ठिकाणी कामे सुरु देखील झाले मात्र कामाचा निकृष्ट पणा यामुळे नागरिकांमधून ओरड होत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फाटा – देवदैठण ते बेलवंडी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सध्या सुरु आहे. मात्र खड्डे बुजविण्यातही निकृष्टपणा असल्याने ग्रामस्थांनी निराशा व्यक्त केली.
वर्दळीच्या या रस्त्यावरील मोठ मोठे खड्डे पहाता रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. त्यामुळे वाहन चालक , प्रवाशांच्या कमालीच्या आक्रोशानंतर सध्या बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली.
मात्र त्यातही असलेला निकृष्टपणा पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुुकाध्यक्ष हरीदास शिर्के, संभाजी देविकर, सर्जेेराव कौठाळे, वसंत बनकर, खंडू पवार आदींनी चाललेले काम थांबवत संबंंधित ठेकेेदाराला कामात सुधारणा करण्याचे सांगितलेेे.
त्यावर संबंधित ठेकेदाराने रस्त्याबाबत कुठलीही तक्रार येणार नाही याची दखल घेत खड्डे बुजविले जातील असे सांगितले. मात्र त्यानंतरही निकृष्टपणेच खड्डे बुजविले जात असल्याने
देवदैठण येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून तसेच परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने खड्डे बुजविण्याचे काम व्यवस्थित न झाल्यास ते बंद पाडून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved