साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या भव्य दिपस्तंभाचे काम पुर्ण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- स्वयंभू शनिमुर्ती वाहुन आलेल्या पानसनाला ओढ्याला गटारीचे स्वरुप आलेले होते. पानसनाला ओढ्याच्या दुरावस्थेबाबत जेष्ठ नेते यशवंतराव गडाख व मंत्री शंकरराव गडाख यांच्या सुचनेनंतर विश्वस्त मंडळाने खर्चाचे सुशोभीकरण हाती घेतले होते.

शनैश्वर देवस्थान ट्रस्टने हाती घेतलेल्या पानसनाला सुशोभीकरण कामातील ७५ फुट उंचीच्या व साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या भव्य दिपस्तंभाचे काम पुर्ण झाले आहे.

शनिमुर्ती व महाद्वार समोर २७ बाय २७ ओट्यावर पंच्याहत्तर फुट उंचीचा भव्य दिपस्तंभ तयार झाला आहे. यासाठी कर्नाटकातून ग्रेनाईट दगड आणण्यात आला आहे.

५० कारागिर दोन वर्षापासून दगड घडवत होते. शनिदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गरज लक्षात घेवून येथे नऊ स्वतंत्र नवग्रह मंदीर होणार आहेत.

दिपस्तंभाच्या बारा आणि पन्नास फुट उंचीवर आठ मंदीरे व दगडी हत्ती विराजमान होणार आहेत. तिनशे टनाहून अधिक दगडाचे वजन लक्षात घेवून दिपस्तंभाचा पाया २० फुट खोल करण्यात आला आहे. हा स्तंभ शिंगणापुरच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24