यात्रेसाठी नदीचे पाणी घेऊन गेलेल्या ‘त्या’ तरुणाचा मोटारसायकल झाडावर आदळून मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यातील गंगाधरवाडी (वावरथ) येथील भाविकांची मोटारसायकल झाडावर आदळून मंगेश बाचकर ठार, तर दोघे तरुण जखमी झाले. जखमींना खडकवाडी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.

सोमवारी पहाटे पळशी-वनकुटे रस्त्यावर ही घटना घडली. मंगेश बाचकर, सौरभ शेरमाळे व सुनील बाचकर हे पौर्णिमेला साकूर यात्रेसाठी मुळा नदीचे पाणी घेऊन गेले होते.

बिरोबाला आंघोळ घालून पूजा केल्यानंतर हे तिघे मोटारसायकलीवरून वावरथ येथे घरी जात होते. नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल झाडावर आदळून मंगेश बाचकर (वय २२) याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जखमी झाले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24