अहमदनगर बातम्या

रात्री शेतात झोपण्यासाठी गेलेल्या तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल; ‘या’ तालुक्यातील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : रात्री शेतात गेलेला मुलगा सकाळी घरी आला नाही तसेच त्याचा फोन देखील लागत नव्हता त्यामुळे त्याला पहाण्यासाठी शेतात गेलेल्या वडील व चुलत भाऊ यांनी शेतात जाऊन पाहिले असता त्या मुलाने शेतातील शेडमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत मिळून आले.

ही घटना कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात घडली आहे. तर नितीन शांताराम वाणी (वय ३९ वर्ष) असे मयत इसमाचे नाव असून तो टाकळी येथील रहिवासी असल्याने टाकळीसह धारणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी नितीन शांताराम वाणी हे आपल्या परिवारासोबत टाकळी येथे राहत होते. धारणगाव परिसरातील किरण शंकरराव दंडगव्हाळ यांची शेती ते वाट्याने करीत होते.

त्या शेतातील शेडमध्ये नितीन वाणी यांचे पाळीव जनावरे असल्याने नितीन हे कधीकधी रात्री तेथे झोपण्यासाठी जात असत. ते शुक्रवारी रात्रीही तेथे झोपण्यासाठी गेले होते. शनिवारी ते सकाळी घरी न आल्याने व त्यांचा फोन न लागल्याने वडील व चुलत भाऊ यांनी शेतात जाऊन पाहिले असता नितीन हे शेतातील शेडमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत मिळून आले.

त्यांनी सदर घटनेची माहिती पोलीस पाटील जिजाबाई निळू रनशूर यांना दिली. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पो. उपनिरीक्षक महेश कुसारे, पो. कॉन्स्टेबल रमेश झडे, रशीद शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भागचंद पोपट वाणी यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पुढील तपास पो. नि. संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक महेश कुसारे हे करीत आहे. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नितीन वाणी यांच्या आत्महत्याचे कारण मात्र समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Ahmednagarlive24 Office