अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- शहरातील सर्जेपुरा येथे गोकुळवाडी बालवाडा कट्टा येथे उभा असलेल्या राजू मारुती कासार (वय २१ रा. शिवाजीनगर, कल्याण रोड, अ. नगर) याला तिघाजणांनी बेदम मारहाण केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, राजू कासार याच्या मोठ्या भावाने आरोपी गोंधळी याच्या बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून तिघा जणांनी शिवीगाळ करत
राजुला लाथाबुक्याने मारहाण करुन त्याच्या गळ्यावर चाकूने वार करुन त्याला जबर जखमी केले. हा धक्कादायक प्रकार आज सकाळी घडला आहे. जखमी राजू कासार या तरुणाच्या फिर्यादीवरून सूरज वसंत गोंधळी,
रोहित राम गोंधळी, राम गोंधळी (सर्व रा.गोकुळवाडी, सर्जेपुरा, नगर) यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोना वेरूळकर हे पुढील तपास करीत आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved