रस्त्यावर घसरुन पडल्याने युवकाचा जागीच मृत्यु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-रस्त्यावर घसरुन पडल्याने युवकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरालगतच्या घुलेवाडी फाटयाजवळ घडली.

अनिल मारुती आवारी (वय ३० रा. घुलेवाडी फाटा) असे या मयत युवकाचे नाव आहे. दुपारी ४ वाजेच्या सुमारास रस्त्यावर घसरुन पडल्याने त्याला त्वरीत घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मात्र औषधोपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. याबाबत रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार फटांगरे हे करत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24