काकडवाडी येथील युवक अडीच महिन्यांपासून बेपत्ता

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील एक युवक तब्बल गेल्या अडीच महिन्यांपासून घरातून बेपत्ता आहे. सोमनाथ राजाराम गायकवाड (वय ३२ वर्ष) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे.

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टरला सदर युवक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

काकडवाडी येथील रहिवाशी सोमनाथ राजाराम गायकवाड हा युवक तळेगाव दिघे येथील पेट्रोल पंपावर जातो, असे सांगून शनिवार दि. २ मार्च २०२४ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडला. त्यानंतर मात्र तो पुन्हा घरी परतला नाही.

उंची ५ फूट २ इंच, केस काळे व बारीक, डाव्या पायाच्या करंगळीचे बोट चिकटलेले, मिशी बारीक व काळी, अंगात लाल रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, निळ्या रंगाचे जर्किंग, पायात काळे सॅडल असे त्याचे वर्णन आहे. गायकवाड हा घरी न परतला नसल्याने कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.

त्यानंतर याप्रकरणी त्याचा भाऊ दत्तू राजाराम गायकवाड (वय २९ वर्ष, धंदा ड्रायव्हर रा. काकडवाडी) यांनी तालुका पोलिसांना खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टरला सदर युवक बेपत्ता असल्याची करण्यात आली आहे.

सदर बेपत्ता युवकाचा पोलीस कसून शोध घेत आहेत. बेपत्ता युवकाबाबत कुणाला काही माहिती असल्यास संगमनेर तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे व दत्तात्रय बडधे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe