Ahmednagar News : गोरक्षनाथ गडावर चोरी! भाविकांमध्ये एकच खळबळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथील सुप्रसिद्ध असलेल्या गोरक्षनाथ गडावर चोरी झाली. गडावरील तीन दानपेट्या फोडून चोरट्याने दान पेट्यातील रक्कम लंपास केली. ही घटना २७ ते २८ जुलै दरम्यान घडली.

या प्रकरणी गोरक्षनाथ गडाचे व्यवस्थापक विक्रम नामदेव कदम यांनी फिर्याद दाखल केली. कदम यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात भादविकच्या ३७९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अज्ञात चोरट्याने २७ ते २८ जुलै दरम्यान गोरक्षनाथ गडावरील तीन दानपेट्या फोडल्या. दानपेट्यातील २३ हजार ७६९ रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली.

दरम्यान या घटनेमुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली असून हा चर्चेचा विषय झाला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास वेगाने करून आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी भाविकांच्या चर्चेतून होवू लागली आहे.