अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरश धुमाकूळ घातला आहे. तसेच महामार्गावर देखील लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
नुकतेच नगर तालुक्यातील अरणगाव येथील हॉटेल शनिराज समोर उभा असलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ९ हजार ७६८ रूपये किमतीचे कोलगेटचे बॉक्स अज्ञात चोरट्याने लंपास केले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील अरणगाव येथील हॉटेल शनिराज येथे रात्रीच्यावेळी उभा केलेल्या ट्रकमध्ये क्लिनर व चालक अनिल गोविंद देसाई (रा.हिरगले ता.गडहिंगलज) हे झोपलेले असताना
अज्ञात चोरट्याने ट्रकमधील कोलगेटचे ३४ बॉक्स सुमारे १ लाख ९ हजार ७६८ रूपये किमतीचे लंपास केले. याबाबत ट्रकचालक अनिल देसाई यांनी दिलेल्या
फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सफौ.पठाण हे करत आहेत.