…तर शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळणार

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- प्राथमिक विकास सेवा संस्थामार्फत 3 लाख 32 हजार शेतकरी सभासदांना पीक कर्जाच्या रक्कमेचे वाटप करण्यात आले असून शेतकर्‍यांनी कर्जाची विहीत मुदतीत परतफेड केल्यास शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके यांनी दिली.

दरम्यान नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत चालू वर्षाच्या खरीप ब रब्बी हंगामात जानेवारी 2022 अखेर 1 हजार 951 कोटी 17 लाख 82 हजार रूपयाचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच तीन लाखांपर्यंतची कर्ज रक्कम शेतकर्‍यांनी विहीत मुदतीत परतफेड केल्यास केंद्र शासन व राज्य शासनाची प्रत्येकी 3 टक्के प्रमाणे व्याज सवलतीची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत जमा होणार असल्यामुळे

शेतकर्‍यांनी शून्य टक्के व्याजाचा लाभ घेण्यासाठी प्रथम त्यांचेकडील संपूर्ण पीक कर्ज रकमेची व्याजासह विहीत मुदतीत परतफेड करणे आवश्यक आहे.

तसेच जिल्हा बँक 3 लाख ते 5 लाखांपर्यंतचे पिक कर्ज रकमेवरील व्याज ‘स्व’ निधीतून भरणा करणार असल्यामुळे जिल्हयातील शेतकरी सभासदांना 2021-22 पासून 5 लाखांपर्यंतचे अल्पमुदत कर्ज शुन्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे.