अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. काही महिन्यापूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत.
मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही वाढणारी संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या माध्यमातून सकारात्मक परिणाम पुढे आले आहेत.
नागरिकांनी आरोग्या विषयी दिलेल्या माहितीतून करोनाची सौम्य व तीव्र लक्षणे असणार्या नागरिकांच्या जास्तीत अँटीजेन टेस्ट करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेवटच्या कोरोना बाधित रुग्णापर्यंत सहजपणे पोहोचून कोपरगाव तालुका कोरोनामुक्त होईल.
त्यासाठी नागरिकांनी तपासणीसाठी आलेल्या आरोग्य विभागाला आपल्या आरोग्यासंदर्भात खरी माहिती सांगावी, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे. आ.काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालय येथे सोमवारी कोपरगाव तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतला.
यावेळी ते बोलत होते. त्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून आरोग्य कर्मचार्यांना सहकार्य करावे. आशा गटप्रवर्तक, आशा सेविका, आरोग्य सेविका व आरोग्य विभागाचे कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे या मोहिमेच्या माध्यमातून आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडत असल्याबद्दल
आ.काळे यांनी विशेष कौतुक केले. दरम्यान, काही दिवसनपूर्वी कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाही तर वेळप्रसंगी त्या रुग्णाला आपला जीव गमवावा लागत आहे. अशा परिस्थितीत आपल्या हॉस्पिटलमध्ये येणार्या कोरोना बाधित रुग्णांकडे अनामत रक्कम कमी आहे
म्हणून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती घेण्यास नाकारू नका. वैद्यकीय सेवा करीत असताना पैशाकडे न पाहता माणुसकी जोपासा, असा सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी पैशांसाठी कोरोनाचा उपचार टाळणाऱ्या रुग्णालयांना सल्ला दिला होता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved