अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- संगमनेरचे वैभव वाढवणाऱ्या २१ दुर्गा माता आहे. त्यापैकी संगमनेर शहरातील कसबापेठ (देवीगल्ली) येथील ४०० वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आहे. वणी येथील सप्तशृंगीचे येथील या देवीला प्रतिरूप मानले जाते.
या देवीला १८ भुजा आहेत. देवीच्या आसनाखालुन भुयारी मार्ग आहेत. या भुयाराचा एक रस्ता घास बाजारातील ऐतिहासिक आंभोरकर वाड्याकडे जातो. तेथून तो पश्चिमेस ज्ञानेश्वराच्या मंदिराच्या बाजूने प्रवरा तीरावरील भवानीबुवा मठापर्यंत जातो. हे स्थान शक्ती व भक्तीचे प्रतीक मानले जाते. मनोकामना पूर्ण करणारी ही माता संगमनेरचे वैभव मानले जाते.
नवरात्रौत्सवात विविध प्रकारचे उत्सव येथे साजरे होतात. नवदांपत्य विविध शहरातून आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी या देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. शहरातील मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग पहाटे ५ पासून दर्शनासाठी रांगेने उभे असतात. विविध जाती धर्माचे श्रद्धास्थान म्हणून हे देवीचे मंदिर ओळखले जाते.
या उत्सवात या देवीची माळ रंगार गल्लीपासून शहरातील प्रमुख मार्गाने निघते. देवीची माळ एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. या मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य वाढले आहे. देवीची प्रसन्न मूर्ती भाविकांच्या डोळ्याची पारणे फेडते.
रूढी परंपरेने चालत आलेला देवीचा हा महोत्सव कोरोना काळातही साजरा होईल, मात्र मंदिराचे बाहेरून देवीचे मुखदर्शन घेता येणार आहे. संगमनेर शहरात रेणुका देवी, देवांग कोष्टी समाजाचे चौंडेश्वरी मंदिरातील धातूची कलापूर्ण मूर्ती अत्यंत आकर्षक आहे.
रंगार गल्लीतील शीतला देवीचे मंदिर राजस्थानी समाजाचे धार्मिक स्थान म्हणून मानले जाते. बाजार पेठेतील गांधी चौकाजवळ कालिका देवी मंदिर प्रसिद्ध आहे. अशा सर्व २१ दुर्गामाताचे मंदिरे संगमनेरात आहे. त्यामुळे या शहराला अध्यात्मिक अधिष्ठान आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved