Ahmednagar News : येत्या २२ तारखेला अयोध्येत श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे. त्या दृष्टीने सर्वच सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान अहमदनगरमधून एक खळबळजनक बातमी अली आहे.
सरकारी वाहनातून पोलिस गस्त घालत असताना मंगळवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास त्यांना ११२ क्रमांकावर कॉल आला. अयोध्येमध्ये राम मंदिराला परवा जात आहे, मला तिथे काही झाले तर सरळ बंदुकीने गोळ्या चालवणार, असे समोरून बोलणाऱ्याने पोलिसांना सांगितले.
दरम्यान या कॉलने पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. पोलीस तातडीने त्याठिकाणी पोहचले. पण ही माहिती खोटी निघाली. अयोध्या येथे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल, याची जाणीव असतानाही खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून योगेश नारायणसिंग परदेशी (वय ४५, रा. जनतानगर, गल्ली क्रमांक ७, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिस कॉन्स्टेबल शरद किसन पवार यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी : संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सरकारी वाहनातून वाहनचालक पोलिस हेडकॉन्स्टेबल गोविंद गोपाळ मोरे यांच्यासमवेत पोलिस कॉन्स्टेबल पवार हे रात्रीच्या वेळी गस्तीवर होते. त्यावेळी ‘डायल ११२’ प्रणालीवर कॉल आला.
समोरून बोलत असलेला जनतानगर गल्ली क्रमांक १, सरस्वती कॉलनी येथे होता. दोन बंदुका आहेत. अयोध्येमध्ये राम मंदिराला परवा जात आहे, मला तिथे काही झाले तर सरळ बंदुकीने गोळ्या चालवणार असे समोरून बोलणारा सांगत होता.
लोकेशन घेऊन पोलिस तेथे तातडीने पोहोचले. ती माहिती देणाऱ्या परदेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.