‘त्या’ आरोपीचा तिसर्‍या दिवशीही सुगावा नाही,पोलीस निरीक्षक म्हणाले….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला मुठेवाडगाव खून प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सचिन काळे रूग्णालयात उपचार घेऊन येताना फरार झाल्याची घटना नुकतीच घडली होती.

परंतु आता तीन दिवस उलटूनही पोलिसांना याचा सुगावा लागला नाही. गंगापूर, पैठण,औरंगाबाद परिसरात तपास सुरु असून त्याला पकडण्यात यशस्वी होऊ असे पोलीस निरीक्षक मसूद खान यांनी म्हटले आहे.

बेड्यासह फरार झालेल्या सचिन काळे याने कमालपूरकडे जाताना रस्त्याचे कडेला समाधान मुठे यांची वस्तीवरून चोरून नेलेली मोटारसायकल क्र. एमएच- 17 सीए-0482 बिडकीन पासून खाली एका खेड्यात बेवारस सापडली.

यामुळे पोलिसापुढे आरोपीस शोधण्याचे मोठे आव्हान आहे. कारण सचिन काळे परराज्यातही गुन्हे करण्यास सराईत आहे.

मोटारसायकल गंगापुरहून पुढे बिडकीनकडे त्यानेच नेली की पोलिसांना तपासात चकवा देण्यासाठी आपल्या हस्तकाकरवी नेऊन सोडली? एक ना अनेक दिशेने पोलीस यंत्रणा कसून तपास करीत आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24