अहमदनगर बातम्या

कोरोना काळात अन्नदानासारखे दुसरे पुण्य नाही – पै.अक्षय कर्डिले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- सध्या जागतिक कोरोना महामारीमुळे सर्वांच्या नोकरी, उद्योग-व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: हातावर पोट असणार्‍या लोकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते.

धार्मिक कार्यक्रमातून अशा लोकांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. अन्नदानासारखे दुसरे पुण्य नाही, म्हणून अशा उपक्रमांची आज गरज आहे. अशा उपक्रम सर्वत्र आयोजित झाले पाहिजे.

संयोजकांनी केलेले कार्य समाजासाठी दिशादर्शक असेच आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते पै.अक्षय कर्डिले यांनी केले. बुर्‍हाणनगर येथील ह.मौला अली, ह.इमामे कासिम सवारीच्या मोहरम 40 व्या निमित्त भंडारा महाप्रसादाचा शुभारंभ पै.अक्षय कर्डिले यांच्या हस्ते झाला.

याप्रसंगी यादे हुसेन आलम कमिटीचे शहरा जिल्हाध्यक्ष हाजी अन्वर खान, हाजी सलीम युसूफभाई, शब्बीर हाजी सलिम, देवानंद कापरे, वाजीद कुरेशी, जुबेर मिर्झा आदि उपस्थित होते.

याप्रसंगी हाजी अन्वर खान म्हणाले, धार्मिक कार्यक्रमातून सामाजिक एकतेचा संदेश दिला गेला पाहिजे. अशा उपक्रमाची समाजाला आज गरज आहे.

डि.जे.सारख्या वायफट खर्चाला फाटा देऊन संयोजकांनी चांगला उपक्रम राबविला असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुजावर वाजीद कुरेशी, मोअज्जम शेख, मुशरान कुरेशी, मोहसीन सय्यद, जुबेर मिर्झा, सफवान शेख, जफर पठाण,

शेख यासीर, शेख शफीक, शेख रियाज, शेख जमीर उर्फ राजू, सोहेल जहागीरदार, शहानवाज तांबोली, शेख करीमभाई फ्रुटवाले, शहबाज जरीवाला आदिंनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने व फातेहाखानीने करण्यात आली.

सवारीचे हाली शब्बीर हाजी सलिम शेख यांनी मान्यवरांचा सत्कार केला. प्रास्तविक मुजावर देवानंद कापरे यांनी केले. हाजी सलिम शेख यांनी सावरीबाबत माहिती दिली. शेवटी जुबेर मिर्झा यांनी सर्वांचे आभार मानले. भंडारा महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला.

Ahmednagarlive24 Office