अहमदनगर बातम्या

महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही, योजेनेमुळे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीलाच मिळणार : मंत्री विखे

Published by
Ahmednagarlive24 Office

महाविकास आघाडीत आता कोणतीही एकवाक्यता राहिलेली नाही. उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लबचे मेंबर झाले आहेत. शरद पवार सातत्याने मुख्यमंत्र्याना भेटत आहेत. काँग्रेसमध्ये आता मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागल्याने महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही. त्यामुळे राज्यात महायुतीचीच सत्ता येणार असून लाडकी बहिण योजेनेमुळे सर्व बहिणींचा आशिर्वाद महायुतीलाच मिळणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील निमगावजाळी येथे महसूल दिनाच्या निमिताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा प्रारंभ आणि दाखल्याचे वितरण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास कोते, प्रवरा बँकेचे मच्छिद्र थेटे, रामभाऊ भुसाळ, भाऊसाहेब जव्हाड संजय गांधी निराधार योजनेचे अध्यव अमोल खताळ, गुलाबराव सांगळे यांच्यासह सर्व संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभाची उपस्थित होते.

याप्रसंगी मंत्री विखे पाटील म्हणाले की, जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर असल्याने मोठ्या प्रमाणात योजना सुरू झाल्या, केवळ घोषणा नाहीतर अंमलबजावणी करणे सरकारची जवाबदारी असून त्याचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहचविण्याकरीता महसूल पंधरवडा आयोजित केल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

राज्यात महायुती सरकारमुळे शेतकऱ्यांचे वीज बील माफ केले आहे. मुलीसाठी उच्यशिक्षण मोफत केले आहे. मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरीकांना मिळणार असून मुख्यमंत्री माझी लडकी बहिण योजनेकरीता जिल्ह्यात ६ लाख अर्ज दाखल झाले असून संगमनेर तालुक्यात ८८ हजार अर्ज दाखल झाले आहेत.

लाडक्या बहिणीना रक्षाबंधनच्या दिवशी योजनेचा लाभ देणार असून महायुतीच्या पाठीशी लाडक्या बहिणीचा आशिर्वाद निश्चित राहील, असा विश्वास व्यक्त करून फक्त योजना आपल्या महायुती सरकारची आहे. मात्र उड्या महाविकास आघाडीचे नेते मारत असल्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला, महायुती सरकार पारदर्शीपणे काम करीत असून भ्रष्टाचाराला कुठेही थारा नाही.

राज्यात चार तलाठी यांना नियुक्तीपत्र दिले. अहिल्यानगर मधील १८९ उमेदवार आहेत. पण तलाठी पदाच्या भरती प्रक्रियेवरून केवळ महसूल विभागाला आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपुर्वक केल्याचा आरोप मंत्री विखे पाटील यांनी लगावला. तालुक्यात ३४ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना २० कोटींचे अनुदान देण्यात आले असून ८४ हजार शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office