Ahmednagar News : महिन्याभरापासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली. तेव्हापासून लोकांचा कल थंड पेयांकडे वायू लागला आहे. याचा गैरफायदा काही जणांनी घ्यायला सुरुवात केली असून अनेक शितपेयांना दुकानांमध्ये खुलेआम भेसळ केली जात असून वापरण्यात येणारा बर्फही अशुद्ध पाण्यापासून बनविण्यात येत आहे. बाकडे प्रशासन सोयिस्करपणे दुर्लक्ष करीत आहे.
मार्च महिन्याच्या शेवटी उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून उन्हाचे चटके बसू लागले आहेत. त्यामुळे थंड पेयाची मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात जागोजागी थंड पेयाची दुकाने थाटली आहेत.
उसाचा रस, सरबत, पेप्सी आदी गोष्टींसाठी वापरण्यात येणारा बर्फ अशुद्ध पाण्यापासून बनवला जात आहे, लस्सी, बदामशेक, आईस्क्रीम, कुल्फी यासाठी खवा वापरण्यात येतो. तसेच या पदार्थामध्ये दुधाची मलाईसुद्धा वापरली जाते. खवा व व दुध यात भेसळ होत असल्यामुळे ही शितपेये पिण्यासाठी हानीकारक असतात. त्यांच्यामुळष बालके व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे प्रशासनं मात्र या दुकानदारीकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करीत असल्याचे दिसून येत नयेत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढली. पाणी टंचाई देखीलजाणवू लागली. लग्न सराईची घाई सुरु झाली. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके लागायला सुरुवात झाली. जसे जसे वाढायला लागले, तशी तशी थंड पेयाची मागणी सुरू झाली.
शहरात जागोजागी थंड पेयाची दुकाने थाटली आहेत. रसवंतीगृह, कुल्फीचे गाडे, आईस गोला, लस्सी, बादाम शेकचे गाडे, शीतपेयगृह जागोजागी सुरू करण्यात आली आहेत. अनेक थंड पदार्थांसाठी बर्फ महत्त्वाचा असतो. बर्फ तयार करणाऱ्या कारखान्याकडून अशुद्ध पाणी वापरले जाते.
बर्फाची ने-आण करताना कुठलीच स्वच्छता ठेवली जात नाही. माती लागणे, घाण लागणे, कचरा लागणे, गटारीची घाण लागणे असे प्रकार तर सर्रास घडतात आणि असाच बर्फ सर्व थंड पेयासाठी गाड्यावर, दुकानात वापरला जातो.
तसेच विविध शितपेय बनविण्यासाठी लागणारे पाणी शुद्ध वापरण्यात येते काय ? त्यासाठी लागणारा बर्फ कसा असतो ? बर्फ बनविताना कुठले पाणी वापरल्या जाते? बर्फ वाहतूक करताना लागणारी घाण, केरकचरा कुठे जातो?
गाड्यावर बनवण्यात येणारे पदार्थ शुद्ध आहेत का? या बाबीकडे कोण लक्ष देते ? आदी प्रश्न अनुत्तरीत आहेत. डोळ्यांनी दिसत असूनही अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
शितपेये विकणाऱ्या गाडीवाल्यांना कुठलाही परवाना नाही. यांनी नगरपरिषदेचा परवाना काढलेला नाही. अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचा परवाना नाही. या थंडपेयाच्या सेवनामुळे बालके व नागरिकांच्या आरोग्यास काही धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.