जिल्ह्यात काल दिवसभरात एकही मृत्यू नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे कोणाचा मृत्यू झाला नाही. तथापि, नव्याने २५८ पॉझिटिव्ह आढळून आले. शनिवारी १०६ रुग्णांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ४३३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्के झाले आहे. मागील २४ तासांत रुग्णसंख्येत २५८ ने वाढ झाली.

त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजार ५७९ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४०, खासगी प्रयोगशाळेत ६४ आणि अँटीजेन चाचणीत १५४ बाधित आढळले.

आतापर्यंत ६० हजार ९१३ रुग्ण आढळून आले असून ९०१ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. ५८ हजार ४३३ कोरोनामुक्तांना घरी सोडण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24