अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील १५ वाळू साठ्यांचे १९ जानेवारीला ऑनलाइन लिलाव होणार आहेत. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा नदीतील वांगी खुर्द, श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीतील नायगाव, मातुलठाण, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण,
कोपरगाव तालुक्यातील सोनारी, कोळगाव थडी याच तालुक्यातील जेऊर कुंभारी, जेऊर, पाटोदा, राहुरी तालुक्यातील मुळा नदीपात्रातील राहुरी खुर्द पिंपरी,
वळण, चंडकापूर वळण, रामपूर, सात्रळ, पुणतांबे, रस्तापूर या तालुक्यातील नदीपात्रातील लिलाव केले जाणार आहे. या ऑनलाइन लिलावांची प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. येत्या १९ जानेवारीला निविदा उघडण्यात येणार आहेत.