म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठी पुढे येत आहे. त्यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखपतीचा त्रास बळावला आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांना हा त्रास होत आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे.

त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या.

दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती पुढे आली नाही. आज (8 नोव्हेंबर) पंढरपूर वारी पालखी मार्ग शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानेला पट्टा लावून भाषण करताना दिसले.

त्यामुळे सहाजिकच त्यांच्या प्रकृतिबाबत विचारणा सुरु झाली. त्यानंतर त्यांच्या पाठीच्या दुखण्याबाबत प्रसारमाध्यमांतून वृत्त आले. ठाकरे यांनी मुंबई येथील गिरगाव परिसरातील सर एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल येथे आपली नियमीत आरोग्य तपासणी करुण घेतली होती.

या वेळी त्यांच्या काही शारीरिक चाचण्याही करण्यात आल्या होत्या. पाठिमागी काही काळापासून ठाकरे यांना शारीरिक त्रास जाणवत होता.

त्यामुळे दिवाळीत होणाऱ्या भेटीगाठीही त्यांनी टाळल्या होत्या. काही काळ वाट पाहूनही हात्रास कमी न झाल्याने ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची शक्यता आहे.