अहमदनगर बातम्या

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ मुलांना मिळेल पोलीस व सैन्यदल भरतीचे मोफत पूर्व प्रशिक्षण! कुठली लागतील कागदपत्रे आणि काय आहे पात्रता?

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- महाराष्ट्रातील शहरी भागच नाही तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला तरुण हे पोलीस व सैन्यदल भरतीसाठी प्रयत्न करताना दिसून येतात व याकरिता मोठ्या प्रमाणावर आपल्याला ग्राउंडची आणि इतर प्रॅक्टिस करताना दिसतात. ग्रामीण भागामध्ये देखील सैन्य भरतीसाठी तरुणांची एक क्रेझ आपल्याला दिसून येते.

या पार्श्वभूमीवर जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या मवेशी येथील पोलीस तथा सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राने अहिल्यानगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली असून

या मुलांना चार महिने कालावधीचे पोलीस व सैन्यदल भरतीचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार असून त्याकरिता पाच डिसेंबर पर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन राजुर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलांना मिळणार मोफत सैन्य व पोलीस दल भरती पूर्व प्रशिक्षण
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकोले तालुक्यात असलेल्या मवेशी येथील पोलीस तथा सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलांकरिता चार महिने कालावधीचे पोलीस व सैन्यदल भरतीचे मोफत पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले

असून याकरिता 5 डिसेंबर पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे अनुसूचित जमातीच्या मुलांना या प्रशिक्षण कालावधीमध्ये मोफत भोजन व राहण्याची सुविधा देखील मिळणार आहे.

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतील?
या मोफत भरतीपूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बारावी उत्तीर्ण मार्कशीट तसेच शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी दाखला किंवा रेशन कार्ड, वय अधिवास प्रमाणपत्र, चार पासपोर्ट आकाराचे फोटो याकरिता आवश्यक आहेत.

आवश्यक असणारी शारीरिक पात्रता
तसेच शारीरिक पात्रतेच्या दृष्टिकोनातून बघितले तर उमेदवाराचे वय किमान 50 किलोग्रॅम आणि वय 18 ते 25 वर्ष असावे. तसेच उमेदवाराची उंची 165 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे. यामध्ये उमेदवाराची निवड शारीरिक चाचणी( 800 मीटर धावणे) व लेखी परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार असून याकरिता प्रत्येकी 50 असे एकूण 100 गुण असणार आहेत.

या पत्त्यावर करावा लागेल ऑफलाइन अर्ज
अनुसूचित जमातीच्या मुलांना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्यांना ऑफलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे व हा ऑफलाइन अर्ज पोलीस तथा सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता. अकोले या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्रामध्ये 6 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता कागदपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रतींसह उपस्थित राहण्याचे आवाहन देखील राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Ajay Patil