अहमदनगर बातम्या

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिल्या या महत्वपूर्ण सूचना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- कोविडमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीच्या ईद-ए-मिलाद जुलूस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर्षी 19 किंवा 20 ऑक्टोबरला ईद-ए-मिलाद साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना गृह विभागाने जारी केले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

प्रशासनाच्या या सुचनाचे पालन करणे बंधनकारक

कोविड नियमांचे पालन करण्याचे आदेश

कोविडच्या पार्श्वभूमिवर मोठया संख्येने गर्दी करू नये

ईद-ए-मिलाद शक्यतोवर घरात राहूनच साजरी करावी.

मिरवणूका काढावयाच्या झाल्यास पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगीने आवश्यक

एका मिरवणूकीत जास्तीतजास्त पाच ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीतजास्त पाच इसमांना परवानगी

मिरवणूका दरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे.

ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन आदेशातील नियमांचे काटेकोर पालन करुन मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखून प्रवचन करण्यास परवानगी देण्यात येत आहे. प्रवचनाने कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office