अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- आनंदी आयुष्यासाठी सेक्स हा एक महत्त्वाचा भाग असतो. सुखद आणि प्रसन्न सेक्ससाठी ऊर्जा देखील गरजेची असते.
ही ऊर्जा दिर्घकाळ टिकण्यासाठी अनेक वेळा चुकीच्या सल्ला घेतला जातो आणि त्याचा आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. योग्य आहारा बरोबरच काही पदार्थांचे नियमित सेवन केल्यास सेक्सचा आनंद घेता येतो.
अकाली उत्सर्गाची कारणे :- ताण, नैराश्य, चिंता, वृध्दापकाळ, मद्य सेवन, निकोटीन / तंबाखूच्या वेदना,मधुमेह, उच्च रक्तदाब, इजा, कोलेस्टरॉल जास्त असणे हृदयरोग,अवरक्त रक्तवाहिन्या (एथ्रोसक्लोरोसिस), कमी टेस्टोस्टेरोन, काही मानसिक आजार,मल्टिपल स्केलेरोसिस, लठ्ठपणा आदी
– लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी काही नैसर्गिक घरगुती उपाय
१. बडीशेप :- बडीशेप ही पुरुष कामवासना वाढविण्यात फार प्रभावी आहे. अॅनीस इस्ट्रोजेनिक संयुगे स्त्राव वाढविते ज्यामुळे लैंगिक उत्तेजना वाढते. तीन आठवड्यापर्यंत रोज दोन वेळा तीन चमचे पाण्यात घेतल्यास फायदा होतो. बडीशेप च्या नियमित वापराने आपल्या कामवासना व निरोगी सेक्स करण्याची इच्छा वाढविते.
२.मेथी :- मेथी एक कामोत्तेजक म्हणून ओळखले जाते. मेथीमध्ये असणारे डिओसजनेंन हे पुरुष व स्त्रियांमध्ये असलेली लैंगिक विषमतेवर खूप उपयुक्त आहे. तसेच मेथी ही पुरुष आणि स्त्रियांच्या मूत्राशयाच्या निमुळत्या भागावर असलेली ग्रंथी व आरोग्यासाठी सुधारण्यासाठी ओळखली जाते.
मेथीत टेस्टोस्टेरोनची पातळी वाढविण्याची क्षमता आहे, तसेच कामवासना सुधारते. मेथीमध्ये फॅटोकेमिकल संयुगे असतात. यामध्ये saponins आणि sapogenins, ही संयुगे कामवासना सुधारतात आणि टेस्टोस्टेरोनचे स्तर वाढविण्यास मदत होते.