अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याची ‘ही’ पर्यटन स्थळे पर्यटकांना घालत आहेत भुरळ, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Picnic Spot : आजची ही बातमी पर्यटकांसाठी खूपच खास राहणार आहे. जर तुम्हीही कुठे ट्रिप काढण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. महाराष्ट्रात पर्यटनासाठी हजारो प्रसिद्ध ठिकाणे आहेत. यामधील शेकडो ठिकाणे ही कोकणातील आहेत.

मात्र याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातही अशी अनेक ठिकाणे आहेत जी एक्सप्लोर केले जाऊ शकतात. जर तुम्ही अहमदनगर जिल्ह्यात ट्रिप काढणार असाल तर आज आम्ही जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या काही प्रसिद्ध पर्यटन स्थळाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

भंडारदरा धरण : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेले हे धरण पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. जर तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणी भेट द्यायची असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. येथे जाऊन पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येणार आहे. येथे राहण्यासाठी देखील चांगले ऑप्शन्स आहेत. आजूबाजूच्या परिसरात चांगले हॉटेल्स उपलब्ध आहेत.

रंधा वॉटरफॉल : तुम्ही भंडारदरा धरण पाहायला गेलात तर त्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले रंधा वॉटरफॉल नक्कीच एक्सप्लोर करायला पाहिजे. भंडारद-यापासून उत्तरेस १० कि.मी.अंतरावर हा धबधबा आहे. या ठिकाणी प्रवरा नदी ५० मीटर खोल दरीत झेपावते. रतनगडात प्रवरा नदीचा उगम होतो. ही प्रवरा नदी डोंगर रांगातून धावते.

ही नदी २० कि.मी.च्या प्रवासानंतर अचानक 50 मीटर खोल दरीत खाली कोसळते. या वॉटर फॉलचे विहंगम दृश्य पर्यटकांना भुरळ घालते. यामुळे येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावत असतात.

सांदण दरी : सांदण व्हॅली हे अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे स्थळ साम्रद या गावातून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. येथे फक्त पावसाळ्यात जाता येत नाही.

हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात मात्र येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या दरीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या दरीत अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे सूर्याचा प्रकाश थेट जमिनीवर पडत नाही. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 किमी लांबवर पसरलेली आहे.