अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-जिल्हा बँकेच्या २१ संचालकपदाच्या जागासाठी येत्या २० फेब्रुवारीला मतदान होत आहे.दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवट दिवस होता.
बँकेच्या सोसायटी मतदारसंघ, शेतीपूरक, बिगरशेती, महिला राखीव दोन राखीव जांगासाठी 312 अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूकीत उमेदवारी दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी
शेवगाव तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातील उमेदवार चंद्रशेखर घुले आणि राहाता तालुक्यातील सोसायटी मतदार संघातील उमेदवार अण्णासोहब म्हस्के यांच्या विरोधात एकही उमेदवारी दाखल झालेला नाही.
यामुळे घुले आणि म्हस्के बिनविरोध निवडणूक येणार येणार आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 173 उमेदवारांचे 206 अर्ज दाखल झाले होते. यामुळे एकुण अर्जांची संख्या 312 झाली आहे.