अहमदनगर बातम्या

त्यांच्याकडून केवळ जनतेची दिशाभूल केली जात आहे : नाहाटा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- कोरोना व यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना महावितरणकडून ऐन दिवाळीच्या तोंडावर रोहित्राचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू आहे.

पावसामुळे यंदा कोणतेच नगदी पीक हाती आले नाही. त्यात राष्ट्रीयकृत बँका पतसंस्था यांनी देखील हात आखडता घेतल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

एकीकडे उसनवारी व कर्ज उधारी करून तो शेती करत आहे. यावेळी शेतकऱ्याला आधाराची गरज असताना. महावितरणकडून रोहित्र बंद केले जात आहेत.

त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. याचे खापर राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे व घनश्याम शेलार यांवर फुटणार आहे.

म्हणून शेलार यांनी 220 kv लोणी येथील विजकेंद्राची क्षमता वाढवण्याचे पिल्लू सोडले असून, जनतेची दिशाभूल करण्याचे काम शेलार करत आहेत. त्यांच्या हयातीत एक पोल उभा केला असल्यास त्यांनी त्याचा पुरावा द्यावा त्या पोलाला घनश्याम शेलार यांचे नाव देऊ अशी टीका माजी सभापती नाहाटा यांनी केली.

कालवा सल्लागार समितीचे पद फक्त मिरवण्यासाठी घेतले आहे.त्याचा काडीचाही फायदा जनतेला झाला नाही.लोणी बेलवंडी शिरसगाव बोडखा परिसरात उन्हाळ्यात अडचण झाली याचे पाप सुद्धा शेलार यांचेच आहे.

नगरपरिषद नगरसेंवकाचे पद वाचवण्याची मांडवली करून शेलार यांनी तनपुरे यांची खास मर्जी संपादीत केली आहे. त्याची तक्रार खुद्द राष्ट्रवादिचे माजी उपनगराध्यक्ष शेख यांनी केली आहे.

अजून मंत्रालयात बैठक व्हायची आहे तो पर्यंत काम चार महिन्यात पूर्ण होईल अशी भविष्यवाणी शेलार करत आहेत. कदाचित मंत्री तनपुरे यांच्याकडून मुलाला सबस्टेशनचे काम घ्यायचे असेल.

त्यामुळे शेलार बाता मारीत आहेत. जे सबस्टेशन जोडायचे शेलार सांगत आहेत ते सर्व पाचपुते यांनी केले ते आहेत. साधी तार सुद्धा शेलार यांमुळे ओढलेली नाही.अशी देखील टीका नाहाटा यांनी केली.

Ahmednagarlive24 Office