अहमदनगर बातम्या

‘त्या’ दोघी आल्या शेजारी बसल्या; एकजण अंगावरच पडली अन … ? महिला शिक्षिकेस घातला १लाख ३५ हजारांचा गंडा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सध्या चोरी करण्यासाठी चोरटे कोणता फंडा वापरतील ते सांगता येत नाही. यात महिला देखील मागे नव्हे तर दोन पावले पुढे आहेत, अस्से म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण अनेकदा चोरी करण्यात महिलांचा देखील मोठा सहभाग असतो. नुकतीच अशीच घटना घडली…

शाळेच्या कामासाठी तालुक्यातील एक शिक्षिका श्रीरामपूरला आली होती काम आटोपल्यानंतर ती शिक्षिका बसस्टँडवर आली होती. दरम्यान ज्या बसमध्ये ती शिक्षिका बसली काही वेळात दोन अनोळखी महिला आल्या अन शिक्षिकेच्या शेजारी बसल्या.

त्यातील एकजण थेट त्या शिक्षिकेच्या अंगावरच पडली अन …? सुमारे १ लाख ३५ हजार रुपयांचे दागिने लंपास करून निघून गेल्या. ही एखाद्या सिनेमातील स्टोरी नसून श्रीरामपूर बस स्टॅण्डवर घडलेली घटना आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील शितल गणेश बनकर, कारेगाव येथील भापकर वस्ती येथील झेडपीच्या शाळेत शिक्षिका आहेत.

कार्यालयीन कामकाजासाठी सोमवारी दुपारी ३.१५ ला त्या श्रीरामपूरला आल्या होत्या. कामकाज आटोपल्यानंतर पुन्हा कारेगावला जाण्यासाठी त्या श्रीरामपूर बसस्टँडवर आल्या. त्याठिकाणी त्या बसमध्ये बसल्या असता, त्या ज्या सिटवर बसल्या होत्या, तेथे दोन अनोळखी महिला आल्या.

त्यापैकी एक महिला त्यांच्या शेजारी बसली आणि दुसरी महिला या शिक्षिकेच्या सिटजवळ येवून त्यांच्या अंगावर ती महिला पडली. तेव्हा या महिलेला शिक्षिकेने बाजूला लोटले.

त्यानंतर त्यांनी आपल्या जवळील पर्समध्ये ठेवलेले दागिने तपासले असता पर्समध्ये ठेवलेले ९० हजार रुपयांचे मंगळसूत्राचे पेंडेल आणि ४५ हजारांचे ब्रासलेट हे चोरीला गेल्याचे लक्षात आले.
बसमध्ये शेजारी बसलेल्या त्या दोन अनोळखी महिलांनीच दागिने चोरल्याचे बनकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office