अहमदनगर बातम्या

‘त्या’ दोघांनी चक्क धर्मग्रंथच चोरून नेले

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : धर्मग्रंथ चोरी प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध येथील पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शहरातील खडकी परिसरात घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अरबाज शाकीर शेख (रा. खडकी, मस्जिदमागे, कोपरगाव) यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, सुनील अरुण दाभाडे (वय २४, रा. बोकटे, ता. येवला, जिल्हा नाशिक) व नवनाथ भागवत पूर्ण नाव माहित नाही,

या दोघांनी संगणमत करून खडकीमधून पवित्र धर्म ग्रंथ चोरी करून घेऊन चालविला होता. परिसरातील नागरीकांनी आरोपी सुनील दाभाडे यास तू हा ग्रंथ कोठून आणला, असे विचारले असता, आरोपीने त्यास शिवीगाळ केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office