त्यांना लग्नाला जाणे पडले महागात…घरी झाले असे काही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  घरातील व शेजारी सर्व नातेवाईकांच्या लग्नासाठी गेल्यामुळे बंद असलेल्याने हीच संधी साधून चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून कपाटातील दागिने व रोख रक्कम असा सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

ही घटना शेवगावमध्ये घडली.याप्रकरणी एकनाथ भानुदास डोंगरे यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, शनिवारी घरातील व शेजारील सर्वजण एका नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेवून चोरट्यांनी घरातील मागील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

घरातील कपाटाची उचकापाचक करुन १ लाख २९ रुपये किमतीचे नँकलेस, झुंबर व वेल तसेच ३५ हजार रुपये रोख रक्कम असा १ लाख ६४ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला.

सर्वजण रात्री उशीरा आल्यानंतर घराचा दरवाजा तुटल्याचा लक्षात आला. तसेच आत प्रवेश केल्यावर कपाट व इतर साहित्याची उचकापाचक करुन दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे हे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24