‘ते’ पेट्रोल आणायला गेले मात्र परत आलेच नाहीत…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- पेट्रोल आणण्यासाठी जात असलेल्या दुचाकीस पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली.

या धडकेत भानुदास सखाराम टावरे या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना पारनेर तालुक्यातील हॉटेल साईदीप जवळील वळणावर घडली. याबाबत सविस्तर असे की,

दत्तात्रय दादाभाऊ टावरे व भानुदास सखाराम टावरे (रा.रांधे ता.पारनेर) हे दोघेजण त्यांच्याकडील ड्रीमयोगा या मोटारसायकलवरून (एमएच०४ जीबी १३२०) अळकुटी येथील पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणन्यासाठी जात होते.

ते दोघे हॉटेल साईदीप जवळील वळणावर आले असता,यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील भानुदास सखाराम टावरे (वय ३५रा.रांधे ता.पारनेर) यांचा मृत्यू झाला तर दत्तात्रय टावरे जखमी झाले.

या अपघातानंतर संबंधित वाहनचालक अपघातात जखमींना मदत न करता तसेच अपघाताची पोलिसांना माहिती न देताच परस्पर पसार झाला आहे.

याप्रकरणी दत्तात्रय टावरे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24