आरणगावात चोरट्यांचा धुमाकूळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- जामखेड तालुक्यातील आरणगाव येथील गदादे वस्तीवर तीन अज्ञात चोरटय़ांनी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी करून १ लाख ३६ हजार रुपयांचा सोन्याचांदीचा ऐवज लंपास केला.

याबाबत तीन अज्ञात चोरयांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या बाबत सविस्तर असे की, लक्ष्मण महादेव अवसरे हे कवडगाव रोडवरील गदादे वस्तीवरील आपल्या राहात्या घरात दि ८ रोजी रात्री झोपले असतांना

मध्यरात्री २ च्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी किचन चा दरवाजा तोडुन आत प्रवेश केला. या नंतर घरातील लोखंडी कपाट तोडून त्यातील रोख रक्कम १५ हजार,

दोन मोबाईल व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ३६ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याच दरम्यान घरातील उचकापाचकीचा आवाज आल्याने घरातील झोपलेले लोक जागे झाले.

मात्र तोपर्यंत चोरटे पळून गेले असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, पो.कॉ शिवाजी भोस यांनी भेट दिली. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ शिवाजी भोस हे करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24