महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- संगमनेर परिसरात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले असून शहरातील बसस्थानकाजवळ लावलेली काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस (दुचाकी नं. एमएच १७ व्ही २३६४) ही भरदिवसा दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी गणपत महादू ताडगे, रा. कऱ्हे, ता. संगमनेर यांच्या तक्रारीवरुन संगमनेर शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस दुचाकी चोरट्याचा शोध घेत आहेत.

दुसऱ्या घटनेत संगमनेर शहरातील चंदरशेखर चौक परिसरात लावलेली दुचाकी नं. एमएच १७ एक्स ९२३९ ही अज्ञात चोरट्याने रात्री १० च्या सुमारास चोरून नेली.

चंद्रशेखर चौकात राहणारा तरुण चेतन विलास तारे याने संगमनेर शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सफो फटांगरे हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24