अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात वाढत्या चोरी, लुटमारी, दरोडा या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. तर दुसरीकडे या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात घरफोड्या सुरूच असून आता या चोरटयांनी बँकांना लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यातच संगमनेर शहरालगत असणाऱ्या थोरात सहकारी कारखानावरील
अमृतनगर सहकारी पतसंस्थेत २९ ऑक्टोबर २०२० रोजी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेचा दरवाजा तोडून ७६ हजार ५५९ रुपयांची रोकड लंपास केली आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर थोरात साखर कारखान्यासमोर अमृतवाहिनी सहकारी पतसंस्था आहे.
गुरुवारी २९ ऑक्टोबरला पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेचा दरवाजा, कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून सुमारे ७६ हजार ४५९ रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे.
याप्रकरणी दत्तात्रय वसंत क्षीरसागर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक परदेशी हे करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved