अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात चोरीच्या घटना सुरूच आहे. दरदिवशी वाढत्या चोरीच्या घटना यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे तर दुसरीकडे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
नुकतेच केडगावच्या लिंकरोड वरील पोद्दार शाळेजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणावरुन अज्ञात चोरट्यांनी ४९ हजार ३०० रुपये किंमतीचे बांधकाम साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली होती.
या प्रकरणी विनोद तुकाराम मगर (रा.भूषणनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मगर यांचे पोद्दार शाळेजवळ बांधकाम सुरू आहे.तेथे बांधकामासाठी विविध प्रकारचे साहित्य ठेवलेले आहे.
यातील ४९ हजार ३०० रुपये किंमतीच्या टाइल्स् फरशा अज्ञात व्यक्तीने ०३ ऑक्टोबर ते ०१ जानेवारी या कालावधीत वेळोवेळी चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.