चाकू हल्ला करत ५० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या व या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. कायद्याचा धाकच उरलेला नसल्याने चोरटे खुलेआम शस्त्रे घेऊन नागरिकांना लुटत आहे.

नुकतेच शेवगाव तालुक्यातील लखमापुरी येथे चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातील व्यक्तींवर चाकू हल्ला करत अंदाजे ५० हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

याप्रकरणी प्रमोद पुंजाराम निर्मळ (वय ३५) यांनी अज्ञातांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, लखमापुरी येथील मराठी शाळेनजीक राहत असलेल्या प्रमोद पुंजाराम निर्मळ यांच्या खोलीचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दीडच्या सुमारास आतमध्ये प्रवेश केला.

त्यावेळी चोरट्यांनी प्रमोद यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत हात व दंडावर चाकूने हल्ला केला. त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली. दरम्यान, चोरटयांनी कपाटाची उचकापाचक करून त्यातील अंदाजे ३० हजारांची रोकड, सोन्याचे वेल, झुंबर व बाळ्या असे दागिने घेऊन पळ काढला.

आरडाओरड ऐकून उठलेल्या ग्रामस्थांनी पाठलाग करून काही चोरट्यांना चोपही दिला. चोरटे पाच ते सहाजण असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच सकाळी शेवगावचे पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. दरम्यान चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलविले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24