अहमदनगर बातम्या

एटीएम फोडून चोरटयांनी लाखोंची रक्कम केली लंपास; या ठिकाणी घडली घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- नगर मनमाड रोडच्याकडेला असलेले इंडीया कंपनीचे एटीएम अज्ञात चोरटयांनी फोडले असल्याची घटना घडली आहे. हि घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे घडली आहे.(Ahmednagar Crime)

दरम्यान या एटीएम मधून 1 लाख 64 हजारांची रोकड लंपास केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ येथील माहामार्गाच्या कडेला असलेले हे खाजगी इंडिया कंपनीचे एटीएम चोरटयांनी गॅस कटरच्या साहयाने फोडले आहे.

चोरटयांनी फिल्मी स्टाईलने सुरू असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर कलरचा स्प्रे मारला तसेच रेकॉडींग केलेली हॉर्ड डीस्कही घेवुन पोबरा केला. तसेच एटीएम मधील 1 लाख 64 हजारांची रोकड लंपास केली आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लोणी पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील यांनी घटना स्थळाला तातडीने भेट दिली आहे. याबाबत अधिक तपास पोलिसानी सुरु केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office