अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-विद्येचे माहेरघर व शिक्षणाची गंगा वाहणाऱ्या शाळेतच चोरीची घटना घडल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. दरम्यान कोरोनामुळे सध्या शाळा बंदच असून याच दरम्यान शाळेत झालेल्या चोरीच्या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.
दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील जिल्हा परिषद शाळेत अज्ञात चोरट्यांनी तिसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न केला असून, चोरट्यानी रात्री, रेकाॅर्ड रूमाच्या व कॉम्प्यूटर लॅबच्या खिडकीचा कडी -कोयंडा उचकटून आत प्रवेश केला रेकॉर्ड रुममधील
सामानाची उचकापाचक करून तोडाफोड केल्याची घटना घडली. यावेळी चोरट्यांनी कॉम्प्युटरच्या वायरिंग तोडून फेकून दिल्या होत्या, शाळेतील बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. तिसऱ्यांदा असा प्रकार गळनिंब येथील जिल्हा परिषद शाळेत घडला.
तसेच हा प्रकार खोडसाळपणा की, चोरी करण्याच्या उद्देशाने अज्ञात इसमाने शाळेत प्रवेश केला असावा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिन्ही वेळेला असा प्रकार घडल्याने गळनिंब येथील पालक वर्गातून संतप्त झाले. दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिका शाळेत गेल्यावर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.
त्यांनी तातडीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य मंडळाच्या लक्षात आणून दिला असता, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सदस्यांनी याप्रकरणी कोल्हार पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved