अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात चोरीच्या घटना सुरूच आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. नुकतेच अकोले तालूक्यात एका सरकारी कर्मचाऱ्याच्या घरी चोरीची घटना घडली आहे.
अकोले तालुक्यातील राजूर येथील कृषी सहायक विकास प्रकाश कापसे यांचे बंद घर फोडून करून चोरट्यांनी लाखाचा ऐवज लंपास केला. ५२ हजारांची रोख रक्कम व ३१ हजार ४५० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले.
ही घटना नवीन वर्षाच्या पहाटे घडली. कापसे हे लग्न समारंभासाठी परगावी गेले होते. घराचा दरवाजा व कडी कोयंडा तोडून चोरांनी आत प्रवेश केला.
सामानाची उचकापाचक केल्यानंतर लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील ऐवज चोरांनी लंपास केला. मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात गुन्हेगारीत वाढ झाली आहे.
चोरट्याने पकडण्यात पोलसांना अपयश येत आहे. पोलिसांच्या या निराशाजनक कामगिरीमुळे पोलिसांच्या कामाबाबत आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.