अहमदनगर बातम्या

अपयशी पोलीस यंत्रणेमुळे नगर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकुळ

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- नगर  तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दुचाकी, मोबाईल, शेतामधील सौरपंप, वीज मोटार, पाळीव जनावरे यासह घरफोडी करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरीला जाण्याच्या घटना घडतायत.

यामुळे नगर तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत.. दरम्यान गेल्या आठवड्यात चोरट्यांनी देऊळगाव सिध्दी, रूईछत्तीशी, राळेगण म्हसोबा, बायजाबाई जेऊर, रतडगाव, चास शिवारात चोरी, घरफोड्या केल्या.

यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. दरम्यान तालुक्यात चोर्‍या, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असली तरी त्या गुन्ह्यांची उकल करण्यात तसेच चोरट्याने पकडण्यात पोलिसांना सातत्याने अपयश येत आहे.

वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. नगर तालुका पोलिसांसह, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरी, घरफोड्या करणार्‍या टोळ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Ahmednagarlive24 Office