अहमदनगर बातम्या

श्रीगोंदा शहरात पुन्हा एटीएम तोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- बँक ऑफ महाराष्ट्र्चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न श्रीगोंदा शहरात झाला असल्याची घटना घडली आहे. कटावणी व हातोडीच्या सहाय्याने हे एटीएम तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, एटीएम फोडणारा एकजण संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा पोलिसांचे एक पथक शहरासह पोलीस स्टेशन हद्दीतील बँकांचे एटीएमची तपासणी करण्यासाठी (दि.26) च्या मध्यरात्री गेले होते.

यावेळी शहरातील एटीएमची तपासणी करत असतांना बँक ऑफ महाराष्ट्र्समोर त्यांना एक व्यक्ती दुचाकीवर बसलेला दिसली. ते त्याच्याजवळ गेले असता त्याने पोलिसांना पाहून पळ काढला.

त्याचवेळी एकजण बँक ऑफ महाराष्ट्र्च्या जिन्यांच्या पायर्‍यांवरून उतरताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करत एटीएमची पाहणी केली असता, त्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीसांच्या लक्षात आले. त्यामुळे संंबंधीताला ताब्यात घेण्यात आले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office