आमदार लंकेच्या तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिवसेंदिवस चोऱ्यांचे घटना घडत असताना पोलीस प्रशासन माय करत आहे? असा संतप्त सवाल आता नागरिक करू लागले आहे.

दिवसेंदिवस होणाऱ्या या धाडसी चोऱ्यांमुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. नुकतेच आमदार निलेश लंकेच्या यांच्या मतदार संघात चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत.

लोकप्रतिनिधींकडूनच पोलीस प्रशासनाला सवाल केले जात नाही यामुळे सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावरच असेलेली दिसून येत आहे.

पारनेर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बखळेमध्ये दोन ठिकाणी तर नागेश्‍वर मंदीर परिसरातील ध्यान मंदीराचे कुलूप तोडून चोरटयांनी चोरीचा प्रयत्न केला.

दोन ठिकाणाहून सुमारे अडिच लाखांची रोकड चोरीस गेली असून ध्यानमंदीरात मात्र चोरटयांच्या हाती काहीही लागले नसल्याचे सांगण्यात आले.

पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास तिघा चोरटयांनी बखळेमधील अ‍ॅड. हरकचंद गांधी यांच्या घराट प्रवेश केला गांधी यांनी ठेवलेली सुमारे अडीच लाखांचे रोकड चोरटयांनी हस्तगत केली.

गांधी यांच्या घरानंतर अ‍ॅड. गांधी यांचा पुतण्या संतोष गांधी यांचे बाजारपेठेतील दुकाण चोरटयांनी मागून फोडले. व गल्ल्यातील चिल्लर तसेच नोटा असा सुमारे अडीच हजार रूपयांचा ऐवज चोरटयांनी चोरला.

त्यानंतर पहाटे तिन वाजण्याच्या सुमारास नागेश्‍वर मंदीर परिसरातील पारनेरकर महाराजांच्या ध्यान मंदीराच्या वाडयाचे कुलूप चोरटयांनी तोडून आत प्रवेश केला.

मात्र तिथे काही हाती लागले नाही व चोरटयांनी तिथून पळ काढला. ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती दिली. पोलिस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे यांनी तात्काळ घटनास्थळी जात चोरटयांचा शोध घेतला.परंतू तोेपर्यंंत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले होते.

पोलीस प्रशासन चोरटयांचा शोध घेत असल्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी सांगितले. साधारण २० ते २२ वयोगटातील हे तरूण असून ते भुरटे असावेत असा प्राथमिक अंदाज आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24