चोरटयांनी सराफाला लाखोंना लुटले; या ठिकाणी घडली घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मालिन होत आहे, तर दुसरीकडे या घटनांना रोख लावण्यात तसेच चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना येणारे अपयश यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

नुकतेच राहुरी शहरातील बाजारपेठेत शिवाजी चौकात सराफ बाजारात चोरट्यांनी दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पथकाने तपास सुरु केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सराफ व्यापारी दीपक गोटीराम नागरे यांचे सराफ बाजारामध्ये संतोष ज्वेलर्स हे दुकान आहे. मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे सहा कुलुपे तोडून दुकानात प्रवेश केला.

दुकानातील शोकेशच्या कप्प्यातील चांदीचे पैंजण व अन्य वस्तू असा चार ते पाच किलो माल चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेबाबत सकाळी परिसरातील लोकांनी नागरे यांना कळविले.

ते दुकानात आले असता चोरी झाल्याचे दिसून आले. सराफ व्यापारी नागरे कुटुंबियांच्या घरी कार्यक्रम असल्याने दुकान दोन दिवस बंद होते. यामुळे दुकानात पाळत ठेऊन चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समजते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24