चोरटयांनी लांबवीले चक्क एक टन सीताफळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असलेल्या बळीराजावर संकटांचा ओघ कायमच आहे. कोरोना काहीसा कमी झाला तर परतीच्या पावसाने झोडपले, ते संकट जाते नाही तोच फळबागांची चोरीच्या घटनांमुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

आजवर शेतातील कांदे, डाळिंब, कलिंगडांची चोरी झाल्याच्या घटना तालुक्यात घडल्या आहेत. आता चोरट्यानी सीताफळांवरही डल्ला मारला. पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथील शेतकरी आबासाहेब वाळुंज यांच्या शेतातून ७४ हजार ५०० रुपये किमतीची सुमारे एक टन सीताफळ चोरट्यांनी लंपास केली.

शनिवारी रात्री हा प्रकार घडला. वाळूंज कुटुंब शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पादने घेते. त्यांनी गोल्डन जातीच्या संकरित सीताफळांची लागवड केली आहे. झाडांना लगडलेली सीताफळे परिपक्व झाल्यानंतर त्यांच्या विक्रीची वेळ आलेली असताच त्यावर चोरांची वक्रदृष्टी पडली.

त्यांनी ७४ हजार ७५० रूपये किमतीची तब्बल १ हजार १०० किलो सीताफळे चोरून नेली. ऐन सणासुदीच्या काळात चोरीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग देखील चिंतेत पडला आहे. अशा प्रवृत्तींना आळा बसावा यास्तही पोलीस प्रशासनाने आक्रमक कारवाई करणे गरजेचंही वाटू लागली आहे, अशी मागणी नागरिक करू लागले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24