अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : यंदाच्या कोरोनाच्या संकटाच्या सावटाखाली काल संपूर्ण महाराष्ट्राने आषाढी एकादशी साजरी केली. संकटातही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली.
ही महापूजा महाराष्ट्राने दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहिली. नगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे या शासकीय महापूजेच्या या प्रक्षेपणाचे चित्रिकरण नगरचे भूमिपुत्र अर्जुन सब्बन यांनी केले.
यंदाच्या शासकीय महापूजेच्या चित्रिकरणाची जबाबदारी दूरदर्शनच्या सोलापूर युनिटकडे होती. पण ऐनवेळी त्या युनिटला क्वारंटाइन करावे लागल्याने ही जबाबदारी पुण्याच्या युनिटला देण्यात आली. सं
पूर्ण तपासणी करून नंतर ही टीम चित्रिकरणासाठी सज्ज झाली. कॅमेरामन अर्जुन सब्बन यांनी कॅमेरा लाइन अप करण्यापासून ते संपूर्ण महापूजेचे चित्रिकरण हे काम एकटा कॅमेरामन असतानाही केले.
यंदा कोरोनामुळे वारी, पालखी सोहळा, मनाचे रिंगण आदी नेहमीप्रमाणे परंपरा पार पाडता आल्या नाहीत. त्यामुळे आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शन याची देही,
याची डोळा दर्शन घेण्याची लाखो भाविकांची इच्छा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेच्या चित्रिकरणानिमित्त महाराष्ट्राला मिळाली, हे चित्रिकरण नगरच्या भूमिपुत्राने केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews