अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सुरत येथून बेलवंडी येथे आलेल्या कुटुंबापैकी ३० वर्षीय तरुणावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु असतानाच
शरीराकडून कोरोनाविरुद्ध उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.
आठ दिवसापूर्वी सुरत येथून बेलवंडी येथे आलेल्या पती पत्नी व मुलांना तालुक्यातील बेलवंडी येथील शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते.
त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. आलेल्या तपासणी अहवालात पती, पत्नी व २ मुले असे सर्व जण पॉझिटिव्ह निघाले.
त्यामुळे या कुटुंबियांना उपचाराकरिता श्रीगोंदा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात दाखल करण्यात आले होते.
यामधील मुलांच्या वडिलांना पाठीमागील आजारामुळे जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांना अहमदनर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने काल सकाळी मृत्यू झाला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com