अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संगमनेर, श्रीरामपूर पाठोपाठ कोपरगाव तालुकाही कोरोनाने व्याप्त होत चालला आहे. तालुक्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले आहेत.
आता कोरोनाची रुग्णसंख्या खूपच वाढली आहे. परंतु या वाढत्या रुग्णांमुळे खूप मोठा तणाव प्रशासनवर येत आहे. ह्या वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 1 ते 4 ऑक्टोबर 2020 पर्यंत अत्यावश्यक
सेवा वगळता कोपरगाव शहर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. कोपरगाव शहरातील वाढत्या करोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेचे अधिकारी, कामगार विविध उपाययोजना करत आहे.
दरम्यान पाठीमागे कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाही तर वेळप्रसंगी त्या रुग्णाला आपला जीव गमवावा लागत आहे.
अशा परिस्थितीत आपल्या हॉस्पिटलमध्ये येणार्या कोरोना बाधित रुग्णांकडे अनामत रक्कम कमी आहे म्हणून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती घेण्यास नाकारू नका.
वैद्यकीय सेवा करीत असताना पैशाकडे न पाहता माणुसकी जोपासा, असा सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी पैशांसाठी कोरोनाचा उपचार टाळणाऱ्या रुग्णालयांना सल्ला दिला होता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved