शेती विकासासाठी आता प्रत्येक गावात काम करणार ‘ही’ समिती ; वाचा सविस्तर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीची परिस्थिती सुधारली तर आर्थिक परिस्थितीही चांगली सुधारेल. त्यासाठी शेतीच्या विकासासाठी उत्तम नियोजन करणे गरजेचे आहे.

त्यासाठी शेतीच्या विकासाठी शेतकर्‍यांना विविध बाबींसंदर्भात योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर लोकप्रतिनिधी, कर्मचारी व कृषीतज्ज्ञ यांचा सहभाग असलेली एक समिती स्थापन करण्याचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत.

 अशी असेल रचना :- या समितीत गावातील कृषी व संलग्न क्षेत्राशी संबंधित असलेल्या किमान 12 व्यक्तींचा समावेश असेल. अर्ध्यापेक्षा कमी नाही एवढे सदस्य महिला प्रवर्गातील असतील. या समितीची मुदत ही ग्रामपंचायतीच्या मुदती इतकीच असेल

तसेच नवीन ग्रामपंचायत गठीत झाल्यापासून 45 दिवसांच्या आत ग्राम कृषि विकास समिती संबंधित ग्रामपंचायतीत गठीत करावी लागणार आहे. पदसिध्द सदस्यांशिवाय इतर सदस्यांच्या नियुक्तीला ग्रामसभेची मंजुरी अनिवार्य आहे.

अशी असेल समिती:- सरपंच पदसिध्द अध्यक्ष, उपसरपंच पदसिध्द सदस्य, ग्रामपंचायत सदस्य प्रगतिशील शेतकरी (तीन पैैकी किमान एक महिला सदस्य, सोसायटीचा अध्यक्ष (एक), शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी गट यांचे प्रतिनिधी (एक), महिला बचत गट प्रतिनिधी (एक), कृषि पुरक व्यावसायिक शेतकरी (दोन), तलाठी हे सदस्य असतील तर कृषी सहाय्यक सहसचिव तर ग्रामसेवक अथवा ग्रामविकास अधिकारी सदस्य सचिव असतील.

समितीचे हे असेल काम :- प्रत्येक महिन्याला किमा एकतरी सभा घेणे. कृषी विषयक सरकारी योजनांना प्रसार व प्रचार करणे. पिक लागवड संबंधी नियोजन व मार्गदर्शन करणे. आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे, खते, किड नियंत्रण, फळबागा लागवडसह अन्य बाबतीत मार्गदर्शन.

दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालनासह अन्य शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शनासाठी संबंधित विभागाच्याअधिकार्‍यांना बोलावणे. पिक काढणी तंत्रज्ञान व विक्रीसाठी बाजारपेठा याबाबत मार्गदर्शन. शेती कर्ज व परतफेड करण्यासाठी समन्वय साधणे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24